अक्षयकुमारला व्हायचे आहे उत्तराखंडचे रहिवासी

बॉलीवूड मधील खिलाडी नंबर वन अभिनेता अक्षयकुमार याने कामातून निवृत्ती घेतल्यावर उत्तराखंड राज्यात रहायची इच्छा व्यक्त केली आहे. अक्षयकुमार सध्या रात्सायन चित्रपटाच्या रिमेकचे शुटींग उत्तराखंड मध्ये करतो आहे. त्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांची डेहराडून येथे नुकतीच भेट घेतली त्यावेळी त्याने हि इच्छा व्यक्त केली असे समजते.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी अक्षयकुमार ला पहाडी टोपी, पुष्पगुच्छ, चारधाम स्मृतीचिन्ह देऊन त्याचा गौरव केला. धामी यांनी या भेटीचे फोटो ट्वीटअर वर शेअर केले आहेत. ते म्हणतात, अक्षयकुमारने उत्तराखंडच्या नैसर्गिक सौंदर्याची खूप प्रशंसा केली आणि भविष्यात येथेच घर बांधून मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली. राज्य सरकार येथील युवकांच्या विकासासाठी रावबित असलेल्या योजनेत सहकार्य करण्याची तयारी अक्षयने दाखविली असून पर्यटन शक्यतेविषयी चर्चा केली.

अक्षयकुमारने १ फेब्रुवारीला मसुरी मधील शुटींग सुरु करून ते पूर्ण केल्यावर आता तो धानोल्टी आणि डेहराडून येथील शुटींग पूर्ण करत आहे.