कारशौकीन, क्रिकेटवेड्या  लता दीदींची इतकी आहे संपत्ती

स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहानपणापासून अतिशय कष्ट करावे लागलेल्या लतादीदी गाण्यात रममाण झाल्या होत्या पण तो त्यांचा उदरनिर्वाह व्यवसाय सुद्धा होता. लतादीदींना क्रिकेट अतोनात प्रिय होते आणि एकदा त्यांनीच सचिनचा सामना असेल तर गाण्याला सुट्टी घेते असे आवर्जून सांगितले होते.

सुरवातीला आर्थिक स्थिती अगदीच बेताची असलेल्या लतादीदींच्या करियरची सुरवात झाली १९४२ मध्ये आणि ३६ भाषांत ३० हजाराहून अधिक गाणी गाऊन त्यांनी गिनीज रेकॉर्ड नोंदवले . विशेष म्हणजे त्यांनी पहिले गाणे ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी गायले पण हे गाणे कधी रिलीज झालेच नाही. त्यांची पहिली कमाई होती २५ रुपये. मात्र आता यांचे मासिक उत्पन्न ४० लाख आणि वार्षिक उत्पन्न ६ कोटींवर होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अतोनात कष्ट केलेच पण अनेक प्रकारचे पुरस्कार सुद्धा मिळविले. आज घडीला दीदींची संपत्ती ३६८ कोटींची आहे असे सांगतात. त्यातील बहुतेक कमाई त्यांनी गाण्यातून केलेली आहे. द.मुंबईत पेडर रोड वर प्रभुकुंज नावाचे त्यांचे अलिशान निवासस्थान आहे.

लता दीदींना कार्सचा शौक होता. त्यांनी पहिली कार घेतली शेवरोलेट. पण ही कार त्यांनी आईच्या नावावर घेतली होती. यश चोप्रा यांनी लता दीदींना वीर जारा चित्रपटाच्या यशाबद्दल मर्सिडीज भेट म्हणून दिली होती. आज त्यांच्या ताफ्यात ब्यूक, क्रिसलर अशा अनेक कार्स आहेत.