मुकेश अंबानीनी केली कॅडिलॅक एक्सॅलेडची खरेदी

देशातील सर्वाधिक श्रीमंत आणि बडे उद्योजक मुकेश अंबानी नेहमीच विविध लग्झरी कार्स मधून जाताना दिसतात. आता त्यांच्या वाहन ताफ्यात आणखी एका महागड्या कारची भर पडली आहे. अंबानी यांनी नुकतीच  कॅडिलॅक एक्सॅलेड या १ कोटी २० लाख रुपये किमतीच्या कारची खरेदी केली असून या कारचा एकच फोटो इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. क्रेझी इंडियाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. मुकेश यांची कार सिल्व्हर कलरची आहे.

भारतीय बाजारात कॅडिलॅक त्यांच्या कार्स विकत नाही. त्यामुळे या कारची खासगी स्वरुपात आयात केली गेली असावी, जगात सर्वात मोठी आणि वेगळा लुक असलेल्या एसयूव्ही पैकी ही एक आहे. विशेष म्हणजे नॉर्मल रोडवरून चालविताना या गाड्यांना अडचणी येतात कारण मुळातच त्यांचे डिझाईन उत्तम गुणवत्तेच्या रस्त्यांचा विचार करून केले गेले आहे. हॉलीवूड मधील अनेक तारे तारका या कार्स वापरतात. भारतात अंबानी यांच्या शिवाय अन्य काही निवडक व्यक्तींकडे अश्या कार्स आहेत. या कारला ६२०० सीसीचे पेट्रोल इंजिन ऑटो ट्रान्समिशन सह दिले गेले असून व्हेरीयंट फ्युअल टाईपवर त्याचे मायलेज १४ किमी पर लिटर असे आहे. ही चार सीटर कार ६.२ लिटर व्ही इंजिन सह आहे.