वंदे भारत ट्रेन साठी देशी विदेशी कंपन्या स्पर्धेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात देशात ४०० नव्या वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केल्यापासून वंदे भारत ट्रेन संदर्भात मोठी चर्चा सुरु झाली आहे. वंदे भारत विकास योजनेत अनेक देशी आणि विदेशी कंपन्या सामील झाल्या असून बॉम्बार्डीअर, सिमेन्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड( भेल) सह अनेक कंपन्यांची नावे पुढे आली आहेत.

रेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच वंदे भारत रेल्वेगाड्यांचे उत्पादन सुरु होईल असा अंदाज आहे. पुढील तीन वर्षात या अतिवेगवान अश्या ७५ रेल्वे उत्पादनाचे ऑगस्ट २०२३ हे लक्ष्य ठेवले गेले असून त्यातील ४४ ट्रेनच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या स्वतंत्रदिन भाषणात त्याचे संकेत दिले होते. ५८ ट्रेनसाठी प्रोपल्शन सिस्टीम तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

मुंबईच्या सीजी पॉवर इंडस्ट्री सोल्युशन लिमिटेड, हिंदू रेक्टीफायर लिमि, पर्नावूचे इलेक्ट्रोलेट प्रा.लिमी, हैद्राबादच्या मेधा सर्वोड्राईव्ह प्रा.लिमी, मुंबईच्या सैनी इलेक्ट्रिकल अँड इंजीनिअरिंग वर्क्स, कोलकाताची टीटागड वॅगन्स, सिमेन्स या प्रकल्पाच्या टेंडर मध्ये सामील झाले आहेत. वंदे भारतच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली प्रोटोटाईप मे महिन्यात आयसीएफ चेन्नई सादर करणार आहे. दुसरी वंदे भारत जून २०२२ रोजी सुरु होईल, तिच्या चाचण्या सध्या सुरु आहेत. वंदे भारत या अतिवेगवान वातानुकुलीत १६ डब्यांच्या चेअरकार ट्रेन आहेत.