कटरिना सलमान सोबत साजरा करणार व्हेलेंटाईन डे

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या २०२१ मध्ये नुकत्याच झालेल्या विवाहाच्या बातम्या दीर्घकाळ मिडिया मध्ये चर्चेत राहिल्या. नव्या विवाहाची नवलाई ओसरून हे दोघे कलाकार आता त्याच्या कामात व्यग्र झाले आहेत. दरम्यान विवाहानंतरचा प्रेमाचे प्रतिक मानला जाणारा व्हेलेंटाईन डे कतरिना विक्की सोबत नाही तर दबंग सलमान खान सोबत साजरा करत असल्याची बातमी आली आहे.

करोनाचा चित्रपट जगतावर फारच विपरीत परिणाम झाला आणि करोनाच्या दुसऱ्या लाटेत तर शुटींग पूर्ण बंद राहिली. पुन्हा थोडा दिलासा मिळतो न मिळतो तोच करोनाची तिसरी लाट आली आणि पुन्हा एकदा शुटींग ना ब्रेक लागला. पण आता केसेस कमी झाल्याने रेंगाळलेली शुटींग पुन्हा जोरात सुरु झाली आहेत आणि आपला सल्लू भैया त्याच्या टायगर थ्रीचे शुटींग पुन्हा सुरु करत असून शनिवारी मुंबईच्या यशराज फिल्म स्टुडीओ मध्ये सलग शुटींग केल्यावर पुढचे अंतिम शुटींग दिल्लीत होत आहे. यात कतरिना सामील आहे.

दिल्लीतील शुटींगसाठी सलमान आणि कतरिना १२ किंवा १३ तारखेला दिल्लीत पोहोचत आहेत आणि तेथे पुढे १० ते १२ दिवस शुटींग पूर्ण केले जाणार आहे. यामुळे कतरिना व्हेलेंटाईन डे च्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी ला सलमान बरोबर असणार आहे.