शाओमी रेडमी के ५० सिरीज मध्ये येणार एक अफलातून फोन

शाओमी प्रेमी युजर्स साठी एक खास बातमी आहे. शाओमी चीन मध्ये लवकरच रेडमी के ५० सिरीज पेश करत असून लिक रिपोर्ट नुसार त्यात एक व्हेरीयंट ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज सह असेल असे समजते. या सिरीज मध्ये के ५०, प्रो, प्रो प्लस आणि के ५० गेमिंग अशी चार मॉडेल्स असतील. कंपनी या सिरीज मधील पाचव्या मॉडेल वर काम करत असून रेडमी के ५० सुपर कप एक्सक्ल्यूझीव्ह एडिशन नावाने हे मॉडेल आणले जाईल असे संकेत दिले गेले आहेत.

गीझ्मो चायनावर या फोन संदर्भात काही लिक्स दिले गेले आहेत. त्यानुसार या फोनला ५१२ जीबी स्टोरेज, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चीपसेट दिला जाईल. यापूर्वी हाच चिपसेट शाओमी १२ सिरीज मध्ये दिला गेला आहे. अन्य फीचर्स मध्ये तापमान नियंत्रणात राहण्यासाठी ड्युअल व्हिसी चेंबर, ४७०० एमएएचची फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी, रिअरला ६४ एमपी प्रायमरी, १३ एमपी सेकंडरी आणि २ एमपी थर्ड कॅमेरा आणि सेल्फी साठी १६ एमपी कॅमेरा असेल. अँड्राईड १२वर चालणारी एमआययुआय ओएस, ६.६७ इंची एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.