कॅनडा पंतप्रधान टूडो यांच्यावर घर सोडून पलायनाची पाळी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो त्यांच्या परिवारासह राजधानीतील निवास सोडून गुप्त स्थळी रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक नागरिकांवर लादले गेलेले करोना प्रतिबंध आणि लसीकरण सक्ती रद्द करावी म्हणून सुमारे २० हजार ट्रक चालकांनी त्यांचे ट्रक घेऊन राजधानी ओटावा कडे प्रयाण करून टुडो यांच्या निवासस्थळाला घेराव घातला आहे. विशेष म्हणजे या ट्रकचालकांना सर्वसामान्य नागरिकांनी समर्थन दिले आहे. परिणामी टुडो यांच्यावर राहत्या घरातून पलायन करण्याची पाळी आल्याचे आणि ते त्यांच्या कुटुंबासह अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे समजते.

शनिवारी ओटावा कडे येणाऱ्या महामार्गावर सुसरे ७० किमीची लांब रांग लागली होती. निदर्शक टुडो यांच्या विरोधात घोषणा देत होते. यांनी या वाहन रॅलीला ‘फ्रीडम कॉन्व्हाय’ असे नाव दिले आहे. त्यात कॅनडाच्या राष्ट्रीय ध्वजासह स्वातंत्र मागणीचा ध्वज घेऊन निदर्शक सहभागी झाले आहेत. करोना प्रतिबंध लादल्याने नाराज अन्य नागरिक निदर्शकांना समर्थन देत आहेत. रस्यांवर मोठ मोठा ट्रक्सचे आवाज आणि हॉर्न सतत वाजवीत हा ताफा संसदेजवळ पोहोचला असे समजते.

ट्रकचालकांना अमेरिका सीमा पार परताना लसीकरण बंधनकारक केले गेले आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला गेला असे सांगितले जात आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी टुडो यांनी ट्रकचालक म्हणजे फारसे महत्व नसलेले अल्पसंख्यांक असे विधान केले होते त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. ट्रक रॅलीचा फटका रस्ते अडविले गेल्याने अन्य प्रवाशांना बसला आहे. विशेष म्हणजे टेस्ला सीईओ एलोन मस्क यांनी निदर्शकांना समर्थन दिल्याचे जाहीर केले आहे.