इतकी आहे आपल्या पृथ्वीची किंमत

घर, फ्लॅट, जमिनी, दागदागिने, वाहने खरेदी करून आता कंटाळा आला असेल तर तुम्ही पृथ्वी विकत घायचा प्रयत्न करू शकता. नवल वाटले ना? पण खरोखरच पृथ्वीची किंमत ठरविली गेली आहे. सरसल युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधील असिस्टंट प्रोफेसर ग्रेग लोघलीन यांनी हे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी स्पेशल फॉर्म्युला वापरला असल्याचे समजते. त्यात पृथ्वीचा आकार, वजन, तापमान, खनिजे, पृथ्वीचे वय आणि इतर वस्तू अश्या अनेक बाबींचा विचार केला गेला आहे. प्रोफेसर ग्रेग यांनी केवळ पृथ्विचीच नाही तर अन्य ग्रहांच्या किमती सुद्धा ठरविल्या आहेत. त्यानुसार मंगळ ग्रह १२ लाख २ हजार रुपये तर शुक्र केवळ ७० पैसे किमतीचे आहेत.

पृथ्वीची किंमत मात्र ३ लाख ७६ हजार २५८ खरब (३,७६,२५,८०,००,००,००,००,०६० ) इतकी आहे. इतकी रक्कम नुसती मोजायची म्हटली तरी कित्येक वर्षे लागतील. अगदी अनेक मशीन्स लावून पैसे मोजायचे तरी त्याला अनेक महिने लागतील. पृथ्वी आपल्या सौर मंडळातील सर्वात महाग ग्रह आहे.

प्रो. ग्रेग सांगतात, पृथ्वीची किंमत करायचा हा इतका व्याप करण्यामागे कारण आहे. लोकांना कळले पाहिजे कि ज्या पृथ्वीवर तुम्ही मोफत राहत आहात तो ग्रह किती मौल्यवान आहे. त्यामुळे पृथ्वी जपली पाहिजे याचे भान सर्वांनी ठेवायला हवे.