मोटोरोला आणणार पहिला २०० एमपी कॅमेरावाला फाईव्ह जी फोन

स्मार्टफोन क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने झाला आणि अवघ्या ६ इंची एका फोन मध्ये सर्व जग सामावले गेल्याचा नित्य अनुभव स्मार्टफोन युजर्स घेत आहेत. आता हे स्मार्टफोन, कॅमेरा आव्हान पेलण्यास सरसावले आहेत. मोटोरोला लवकरच पहिला २०० एमपी कॅमेरा असलेला फाईव्ह जी सपोर्ट करणारा स्मार्टफोन लाँच करत असून हा फोन जून मध्ये बाजारात येईल असे सांगितले जात आहे. या फोनचे नाव आहे मोटोरोला फ्रंटीअर २२.  सोशल मिडिया रिपोर्ट नुसार लिक झालेल्या माहिती प्रमाणे या फोनसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन वन प्लस प्रोसेसर दिला जात आहे.

फोनसाठी ६.६७ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले, अँड्राईड १२ ओएस, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, असेल. फोनचे सर्वात आकर्षक फिचर आहे कॅमेरा. रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट दिला जात आहे. त्यात २०० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ५० एमपीचा वाईड अँगल, १२ एमपीचे मॅक्रो सेन्सर असतील शिवाय सेल्फी साठी ६० एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५००० एमएएच बॅटरी असेल. फोन साठी १२५ डब्ल्यू वायर्ड सपोर्ट दिला जाईल असे सांगितले जात असून तसे झाले तर हा सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा फाईजी फोन ठरेल.

मोटोरोलाने नुकतेच दोन नवे स्मार्टफोन लाँच केले असून मोटो जी ६० आणि मोटो जी ४० फ्युजन अशी त्यांची नावे आहेत. मोटो जी साठी १०८ एमपी कॅमेरा तर मोटो जी साठी ६४ एमपी कॅमेरा आहे.