बेबी एबी डीवीलीअर्स आयपीएल २०२२ साठी उपलब्ध

द.आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज एबी डीव्हीलीअर्स आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्सचे एक मुख्य आकर्षण होते पण यंदा त्याने आयपीएल मधून अंग काढून घेतले आहे. पण एबीची उणीव भासणार नाही असा एक नवा गडी सध्या फारच चर्चेत आला आहे. द. आफ्रिकेचा हा खेळाडू सध्या अंडर १९ संघातून खेळतो आहे आणि अंडर १९ वर्ल्ड कप मुळे तो खूपच प्रसिद्धी मिळवून राहिला आहे. डेवाल्ड ब्रेवीस नावाचा हा तरुण खेळाडू जणू एबी डीवीलीअर्सची कॉपी आहे. त्याचे फटके, खेळण्याची स्टाईल अगदी एबीची आठवण करून देत असल्याने त्याला बेबी एबी किंवा एबी २.० या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे या बेबी एबीने आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली असून मेगा ऑक्शन साठी नाव नोंदणी केली आहे. त्याचा आवडता संघ रॉयल चॅलेंजर्स हाच आहे. सोशल मिडीयावर फोटो शेअर करताना त्याने रॉयल चॅलेंजर्सच्या जर्सी मधला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तो खरोखरच रॉयल चॅलेंजर्स मधून विराट कोहली सोबत खेळणार का याची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे बेबी एबी , ओरिजिनल एबी डीव्हीलीअर्स प्रमाणेच १७ नंबरची जर्सी वापरतो.

अंडर १९ विश्व चषक स्पर्धेत बेबी एबीने चार सामन्यात ९०.५० च्या सरासरीने ३६२ धावा ठोकल्या असून त्यात ३ अर्धशतके तर १ शतक आहे.