नवाजुद्दिनने मुंबईत घेतली अलिशान हवेली

गेली दहा वर्षे आपल्या अभिनय गुणांनी बॉलीवूड मध्ये चर्चेत असलेला अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याने मुंबईत एका अलिशान बंगला घेतला आहे. खरे तर हे त्याचे स्वप्नातील महाल म्हणता येईल असे मोठे घर असून नवाजुद्दिनने या घराचे शेअर केलेले फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. सफेत रंगाच्या या घराला त्याने वडिलांचे नाव दिले आहे. ‘नबाब’ असे या हवेलीचे नाव आहे. गेली तीन वर्षे नवाजुद्दिनने स्वतःच्या देखरेखी खाली घराचे रीनोवेशन काम केले असे समजते. त्याचे मूळ गाव बुधाना मधल्या आपल्या कौटुंबिक घरावरून प्रेरणा घेऊन त्याने नव्या घराची सजावट केल्याचे सांगितले जात आहे.

या अलिशान घराला मोठा व्हरांडा, शानदार छत, खूप मोकळी जागा, पारंपारिक लाकडी प्रवेशद्वार आहे. नाव कमावण्यासाठी नवाजुद्दिन याने प्रामाणिक कष्ट उपसले आहेत आणि आजही त्याचे पाय जमिनीवर असतात असे म्हटले जाते. नवाजुद्दिनने या नव्या हवेलीत खूप झाडे लावली आहेत.

वर्क फ्रंट बाबत बोलायचे तर नवाजुद्दिनचा कंगना राणावत बनवत असलेला ‘टिकू वेडस शेरू’ हा चित्रपट बनतो आहे. त्याचबरोबर त्याचा हिरोपंती २ हा चित्रपट सुद्धा पुर्णत्वाकडे गेला असून त्यात नवाजचा निगेटिव्ह रोल आहे. एका मुलाखतीत त्याने २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी खूप बिझी असल्याचे सांगितले होते. कारण या वर्षात त्याचे ४-५ चित्रपट रिलीज होत आहेत.