पिझ्झा इतक्या सहजतेने पाकिस्तानात होते एके ४७ ची होम डिलिव्हरी

शेजारी राष्ट्र पाकिस्तान मध्ये रिव्हॉल्व्हर, पिस्तुलच काय पण अगदी एके ४७ सारख्या घातक शस्त्रांची होम डिलिव्हरी चर्चेत आली असून कुणीही पैसे मोजू शकणारा नागरिक अशी हत्यारे मागवू शकतो आणि एखादा पिझ्झा घरपोच द्यावा इतक्या सहजपणे ही हत्यारे त्यांना घरपोच दिली जातात असे उघड झाले आहे.

ही खरेदी प्रक्रिया अतिशय सोपी आहे. इंटरनेट वर हवे ते शस्त्र पसंत करायचे, डीलरला फोन करायचा आणि किंमत फायनल करायची. थोडी आगावू रक्कम भरली कि काही दिवसात हवे हे हत्यार घरपोच मिळते अशी ही प्रक्रिया आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पाकिस्तान मध्ये कुठेही या प्रकारे हत्यार खरेदी करता येते. ही विक्री गुप्तपणे नाही तर अगदी उघड उघड होते असेही समजते.

फेसबुक, व्हॉटस अपवर सर्व शस्त्राचे कॅटलॉग आहेत. पाकिस्तानी नागरिक सार्वजनिकरित्या हत्यार निवड करतात आणि आगावू रक्कम भरली कि हत्यार घरपोच येते. उरलेली रक्कम डिलिव्हरी नंतर दिली जाते. डिलिव्हरी देताना ग्राहकाकडे शस्त्र परवाना आहे का नाही याचीही चौकशी होत नाही. पूर्ण व्यवहार फोन वरून केला जातो. कराची मध्ये सर्वात स्वस्त दरात हत्यारे मिळतात. त्यासाठी दोन वेगळी नेटवर्क कार्यरत आहेत.एका नेटवर्क वरून सौदा केला जातो तर दुसऱ्या नेटवर्क वरून पुरवठा केला जातो असे समजते.