आज टाटांची होणार ‘एअर इंडिया’

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली एअर इंडिया ६९ वर्षानंतर गुरुवारी पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या छत्राखाली येत असून कंपनीच्या महाराजाला गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी टाटा ग्रुप ‘ऑन टाईम परफॉर्मन्स’ वर लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते. गुरुवारी एअर इंडिया संदर्भातील सर्व कायदेशीर ऑपचारीकता पूर्ण केली जात असून गुरुवार पासूनचा एअर इंडियाच्या बोईंग ७७७  चार फ्लाईट मध्ये उन्नत भोजन सेवा चरणबद्ध पद्धतीने सुरु होत असल्याचे सांगितले गेले आहे. गुरुवारी विमान कंपनी टाटा समूहाला सोपविली जात असताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हजर राहणार आहेत.

एअरइंडियाची स्थापना टाटा समूहानेच केली होती पण ६९ वर्षापूर्वी या विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले गेले. तेव्हापासून कंपनी हळूहळू नुकसानीत गेली आणि प्रचंड कर्जाचा बोजा कंपनीच्या डोक्यावर आला. तेव्हा सरकारने कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यात टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावून कंपनी परत खरेदी केली. या संदर्भात कंपनीने सर्व क्रू मेम्बर्सना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘आज रात्री आपण पब्लिक सेक्टर मध्ये जात आहोत. पुढचे सात दिवस महत्वाचे आहेत. आपली इमेज, अॅटीटयूड आणि परसेप्शन बदलावे लागणार आहे.’ या कंपनीची धुरा संदीप वर्मा आणि मेघा सिंघानिया यांच्याकडे सोपविली जात आहे. त्यांनी केबिन क्रू वर मुख्य भर दिला असल्याचे समजते.

एअर इंडिया फ्लाईट मध्ये प्रवाशांना मेहमान म्हटले जाणार असून टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा रेकॉर्डेड संदेश ऐकविला जाणार आहे.