केरळच्या पलाक्कड जिल्ह्यातील दीपक कुमारने 24 तासात 100 किलोमीटर पायी चालत लोकांना प्लास्टिकच्या वापराविषयी जागृक करण्याचा प्रयत्न केला आहे.. या प्रवासात त्याला जे काही प्लास्टिक रस्त्याच्या कडेला दिसले ते त्यांनी आपल्या शरीरावर लावत प्रवास पुढे सुरूच ठेवला. आपल्या या प्रवासादरम्यान दीपकने सार्वजनिक ठिकाणांवर कचरा न फेकण्याचे आवाहन करणारी एक पाटी देखील पकडली होती.
जनजागृतीसाठी ही व्यक्ती चालली 35 किलो कचऱ्याने शरीर झाकून 100 किमी
स्वच्छतेसाठी दीपकने 1 ऑक्टोंबरला सकाळी 8 वाजता दोन वॉलिंटियरसोबत पलाक्कडच्या विक्टोरिया कॉलेजपासून प्रवासाला सुरूवात केली होती.आणि दोन ऑक्टोंबरला गांधी जयंतीला तो एर्नाकुलम दरबार हॉल ग्राउंड येथे पोहचला. या प्रवासात त्याने 35 किलो वापरण्यात आलेले चिप्स पॉकेट, शॅम्पू आणि पाण्याची बाटली सारख्या कचऱ्यांनी आपले शरीर झाकले होते.
दीपकने सांगितले की, मी लोकांना सांगू इच्छितो की, कमीत कमी प्लास्टिकचा वापर करा. शक्य असेल तर रिसायकल प्लास्टिकचा वापर करा. त्याने सांगितले की, फेब्रुवारी 2018 मध्ये 24 तासांचे पहिले कॅम्पेन सुरू करण्यात आले होते. तेव्हा वॉलिंटियर्सनी 4000 किलो प्लास्टिक कचरा उचलला होता. त्यानंतरच्या अभियानात त्याने 16 किलोमीटर भागातील 1 लाख चॉकलेट आणि कॉपी रॅपर्स जमा केले होते.
दीपकने सांगितले की, आम्ही केरळमधील जिल्ह्यात एक नेटवर्क बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण अनेक अभियानांना लोकांचा सपोर्ट मिळत नाही.