या देशात केवळ 80 रूपयांमध्ये खरेदी करू शकता घर

इटलीमध्ये जाऊन राहणे हे अनेकांचे स्वप्न असते. आता इटलीतील द्वीप सिसिलीतील एक नगर परिषद परदेशी नागरिकांना तेथे राहण्यास मदत करत आहे. या गावात राहण्यासाठी केवळ 1 युरो म्हणजेच 80 रूपये द्यावे लागतील. सिसिलीतील ग्रामीण भागातील गाव संबूका येथील अधिकाऱ्यांनी 2019 मध्ये कमी होत चाललेली गावातील लोकसंख्येवर उपाय म्हणून ही खास योजना बनवली आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की, गावातील रिकाम्या घरांची केवळ 80 रूपयांमध्ये विक्री केली जाईल.

(Source)

युरोपमधील अनेक गावांप्रमाणेच संबूकामधील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 5,800 आहे. येथील लोक जवळच्या शहरात अथवा परदेशात राहण्यास निघून गेले आहेत. त्यामुळे येथील नगर परिषदेने येथे नवीन लोकांना राहण्यास आमंत्रित केले आहे.

(Source)

संबूकाचे महापौर लियोनार्डो सिकासियो सांगतात की, प्रथम नगर परिषदेमध्ये कायदेशीर कारवाई पुर्ण केल्यानंतर घर खरेदी करू शकता. याआधी 16 घरांचा लिलाव करण्यात आला. ही सर्व घर परदेशी व्यक्तींनी खरेदी केली. संबूकाचे उपमहापौर ज्यसेप कॅसियोपो सांगतात की, ज्या लोकांनी ही घर खरेदी केली आहेत त्यातील अनेकजण संगीतकार, पत्रकार आणि लेखक आहेत.

(Source)

येथील रहिवाशी सांगतात की, जगभरातील लोक आमच्या गावातील घरांसाठी आणि संस्कृतीमध्ये रूची दाखवत आहेत. आतापर्यंत 60 घर विकली गेली आहेत. येथे घर खरेदी करणाऱ्यांसाठी एकच अट आहे ती म्हणजे खरेदीदाराला घर व्यवस्थित करण्यासाठी पैसे लावावे लागतील. घर दुरूस्त करण्यासाठी खूप खर्च येऊ शकतो. यासाठी त्यांना तीन वर्षांचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे.

येथील लोक गावात पुन्हा एकदा लोकसंख्या वाढलेली पाहून आनंदी आहेत. संबूकाची योजना यशस्वी होताना पाहून, आजुबाजूचे गाव देखील अशाच प्रकारची योजना सुरू करण्याचा विचार करत आहेत.

Leave a Comment