हा शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून दरमहा कमवतो लाखो रुपये

हरियाणामधील अंबाला जिल्ह्यातील पाटवी गावात राहणाऱ्या दर्शनचा युट्यूब चॅनेल ‘फार्मिंग लीटर’ हा युट्यूबवर सर्वाधिक प्रभावी कृषि चॅनेल्स पैकी एक आहे. लाँच केल्यानंतर एका वर्षातच या चॅनेलचे 2 मिलियन पेक्षा अधिक स्बस्क्राइबर्स झाले असून, दररोज लाखो लोक या चॅनेल वरील व्हिडीओज् बघतात.

(Source)

इनोव्हेटिव्ह, देशी शेतीच्या हटके पध्दतीपासून ते पिकांना लावण्याच्या पध्दती, डेअरी फार्मची स्थापना, कृषि उत्पादनांची समीक्षा अशा विविध गोष्टींचे व्हिडीओ दर्शन आपल्या चॅनेलवर टाकत असतो. दर्शनचा चॅनेल शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी दूर करण्याचे एक साधन आहे.

(Source)

दर्शन सांगतो की, 2017 मध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी मी डेअरी फार्मिंगची सुरूवात केली. तेव्हा माझ्यासमोर गायांना प्रशिक्षित करणे, त्यांचा चारा तयार करणे, त्यांच्यावर उपचार करणे अशा अनेक गोष्टींची अडचण होती. या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी मी ऑनलाइन सर्च करण्यास सुरूवात केली. मात्र ऑनलाइन शेतीबद्दल सविस्तर अशी माहिती सापडली नाही.

त्यानंतर दर्शनने पंजाब आणि हरियाणामधील यशस्वी शेतकऱ्यांना जाऊन भेटण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळेल, असे व्हिडीओज टाकण्यास सुरूवात केली. आज दर्शनच्या चॅनेलवर 500 पेक्षा अधिक व्हिडीओ आहेत.

Leave a Comment