पुतीन यांच्या गुप्त अलिशान महालाचे फोटो लिक

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे कट्टे विरोधक एलेक्सेई नवेलनी यांनी पुतीन यांच्या गुप्त, अलिशान महालाचे फोटो ऑनलाईन शेअर केले असून पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. नवेलनी यांनी ब्लॅक सी मधील ही अलिशान हवेली पुतीन याच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. या महालात सर्व ऐशोआराम आणि अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यात पुतीन यांच्या मनोरंजनासाठी पोल डान्स रूम, स्ट्रीपटीज हॉल, हुक्का लाउंज यांचा समावेश असून या महालासाठी ७५०० कोटीचा खर्च केला असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी सुद्धा या महालाचे फोटो जारी केले गेले होते त्यात महालात कॅसिनो, अॅक्वा डिस्कोची सुविधा असल्याचे नमूद केले गेले होते. ही हवेली १६ मजली असून त्यातील बहुतेक मजले अंडरग्राउंड आहेत. जेम्स बॉंडच्या गुप्त अड्ड्याप्रमाणे हे ठिकाण आहे असे सांगितले जाते. पुतीन यांनी मात्र ही हवेली त्यांच्या अब्जाधीश मित्राच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे.

या महालात जागोजागी रशियाचे प्रतिक असलेले दोन डोक्याचे गरुड लावलेले आहेत. टाईम मासिकाशी बोलताना नवेलनी यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे पुतीन त्यांच्या सत्तेत अडथळा आणणाऱ्या कुणाचाही काटा काढतात आणि त्यासाठी त्यांनी ४ लाख जवानांची फौज तैनात केलेली आहे. नवेलनी यांनी २०११ मध्ये एका फौंडेशन ची स्थापना केली असून त्यातून अनेक श्रीमंत लोकांच्या भानगडी, भ्रष्टाचार उघड केले आहेत. त्यानंतर रशियातील लोक निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात म्हणून रस्त्यावर उतरले होते. २०१२ मध्ये नवेलनी यांना लाकूड घोटाळ्यात फसविले गेले आणि त्याच्या भावाला तुरुंगात डांबले गेले होते.

२०१३ मध्ये नवेलनी मॉस्कोचे मेअर बनले पण त्यांना २०१६ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत सरकारला विरोध केला म्हणून सैबेरिया मध्ये पाठविले गेले तेथे त्यांना विष दिले गेले होते असे सांगतात. त्यातून ते वाचले आणि देशात परतले तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले गेले होते.