निरोगी राहण्यासाठी एकदा तरी या झऱ्यात करा आंघोळ

जगभरात अशी अनेक ठिकाण आहेत, जी पाहून आपण आश्चर्यचकित होतो. असेच एक रहस्यमयी ठिकाण तुर्कीमधील पमक्कुले येथील पर्वतांवर आहे. या ठिकाणी नैसर्गिकरित्या स्विमिंग पूल बनलेले आहेत. येथील झऱ्यांचे पाणी आपोआप गरम होते, त्यामुळे हा झरा वैज्ञानिकांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.

(Source)

सांगण्यात येते की, गरम पाण्याचे झरे येथे हजारो वर्षांपासून आहेत. येथील पाण्याचे तापमान हे 37 डिग्री सेल्यिस ते 100 डिग्री सेल्सियच्या मध्ये असते.

(Source)

सांगण्यात येते की, या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये अंघोळ केल्याने त्वचेचे आजार ठीक होतात. याच कारणामुळे हे गरम पाण्याचे झरे बघण्यासाठी जगभरातून लोक येतात.

(Source)

या ठिकाणावरील सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आपोआप तयार झाले आहेत. कोणालाही याबाबत काहीही माहिती नाही.

(Source)

या झऱ्याच्या पाण्यावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. त्यानुसार, पाण्यात असलेल्या खनिजांचा संपर्क झाल्याने कॅल्सियम कार्बोनेट बनते. जे हजारो वर्षांपासून झऱ्याच्या किनाऱ्यावर जमा होत आहेत.

 

Leave a Comment