1700 वर्षांपुर्वी बुडालेल्या जहाजात सापडले रोमन साम्राज्याच्या काळातील माठ

स्पेनच्या बेलेरिक आयलंडवरील मेजोरका तटापासून लांब समुद्रात 1700 वर्षांपुर्वी बुडालेल्या जहाजांवर रोमन साम्राज्याच्या काळातील 200 पेक्षा अधिक माठ सापडले आहेत. यामध्ये 100 चांगल्या स्थितीत आहेत. सांगण्यात येत आहे की, या माठांचा वापर माश्यांची चटनी, ऑलिव ऑइल आणि दारू ठेवण्यासाठी केला जात असे. जुलै महिन्यात फेलिक्स अलारकोन आणि त्यांच्या पत्नीने याचा शोध लावला आहे.

(Source)

फेलिक्स अलारकोन यांनी सांगितले की, हे माठ 33 फूट लांब आणि 16 फूट रूंद जहाजेमध्ये सापडले. समुद्रातील पाणी आणि मीठ यामुळे माठांचे दोन हँडल जाम झाले असून, त्यामुळे उघडले गेलेले नाहीत. बेलेरिक इंस्टीट्यूट ऑफ मेरीटाइम आर्केलॉजी स्टडीजचे प्रमुख सेबेस्टियन मुनर यांनी सांगितले की, हे माठ व्यवस्थित सुरक्षितरित्या जहाजेमधे ठेवण्यात आले होते. हे व्यापारी जहाज मेलोर्का आणि स्पेनच्या मध्ये ट्रांसपोर्टचे काम करायचे.

(Source)

तंज्ञाचे म्हणणे आहे की, जहाजांच्या अवशेषावरून वाटते की, एखाद्या वादळामुळे हे जहाज बुडाले असेल. माठ काढण्याचे काम स्पेनिश नौदलाच्या जवानांनी आणि राष्ट्रीय पोलिसांच्या डाईव्हर्सनी केले. हे माठ मेलोर्का येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. येथे संशोधक हे माठ कशापध्दतीने सुरक्षित ठेवण्यात आले होते याचा अभ्यास करतील.

(Source)

सांगण्यात आले आहे की, हे माठ 4 महिने स्विमिंग पूलमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून, त्याच्यावरील मीठाच्या पाण्याचा थर निघून जाईल. ही प्रक्रिया गरजेचे असून, जेणेकरून माठ खोलताना तुटणार नाहीत.

 

Leave a Comment