देखणा प्राणी झेब्रा


झेब्रा हा विशिष्ट रंगामुळे देखणा दिसणारा प्राणी भारतात झु मध्येच पाहायला मिळतो. मात्र एक खूर असलेल्या जनावरातील एकमेव असा हा प्राणी मुळचा आफ्रिकेतील आहे. तो गाढव प्रजातीचा मानला जातो मात्र दिसायला घोड्यासारखा आहे. झेब्रा पाहिला की त्याच्या काळ्या रंगावर पांढरे पट्टे असतात का पांढऱ्या रंगावर काळे पट्टे असतात असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्याचे उत्तर असे की झेब्रा काळा असतो आणि नंतर त्याच्या अंगावर पांढरे पट्टे येतात.


माणसाचे फिंगरप्रिंट जसे युनिक असतात तसेच झेब्राच्या अंगावर असणारे पांढरे पट्टे युनिक असतात. म्हणजे प्रत्येक झेब्राचा पॅटर्न वेगळा असतो. झेब्रा दीर्घकाळ ताशी ६५ किमी वेगाने पळू शकतो. तो कळप करून राहतो आणि या कळपाला झील किंग डॅझल म्हटले जाते. झेब्रा घोडा किंवा गाढवाप्रमाणे पाळला जात नाही. ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कान आणि शेपटीचा वापर करतात. झेब्र्याचे कान सर्व दिशांनी फिरू शकतात. घोडा आणि झेब्रा एकत्र राहू शकत नाहीत कारण झेब्रा एका विशिष्ट व्हायरसचा वाहक आहे आणि हा व्हायरस घोड्यासाठी जीवघेणा ठरतो.


झेब्रा आणि शहामृग एकत्र राहू शकतात. ते एकमेकांचे शिकाऱ्यापासून संरक्षण करतात. शहामृगाची दृष्टी झेब्र्यापेक्षा अधिक तीक्ष्ण असते तर झेब्र्याची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता अधिक असते. झेब्रा मादी पिलाची खूप काळजी घेते. पिलू वर्षभर आईचे दुध पिते. झेब्र्याला रंग कळतात पण केशरी रंग त्याला ओळखता येत नही. ग्रेव्ही, माउंटन आणि प्लेन्स अश्या झेब्राच्या तीन जाती आहेत. ते उभ्याने झोपतात, कळपाचे नेतृत्व नर झेब्र्याकडे असते. झेब्रा आणि गाढव यांच्या संकरातून जन्मलेल्या प्राण्याला झोंकी म्हणतात.

Leave a Comment