भूतान मध्ये टाटा कार्सचा जलवा
भारतीय बाजारात उत्तम कामगिरी करत असलेली टाटा मोटर्स आता शेजारी देश भूतान मध्ये जलवा करण्यासाठी सिद्ध झाली आहे. प्रवासी कार्स श्रेणीतील सहा मॉडेल्स टाटा भूतानच्या बाजारात उपलब्ध करून देत असल्याचे कंपनीने शुक्रवारी जाहीर केले. भूतान मधील अधिकृत वाहन वितरक सामदेत व्हेईकल्सच्या सहकार्याने टाटाच्या कार्स भूतान मधील विक्रीसाठी उपलब्ध केल्या जात आहेत असे सांगितले गेले.
टाटा टियागो, टिगोर, अल्ट्रोस, नेक्सॉन, हॅरीअर व फ्लॅगशीप एसयूव्ही सफारीची मॉडेल्स भूतान साठी उपलब्ध करत आहे. या सर्व गाड्या प्रवासी ‘इम्पॅक्ट २.०’ डिझाईन बरहुकुम बनविल्या गेल्या आहेत. उत्तम सेफ्टी फीचर्स आणि स्टँडर्ड परफोर्मन्स अशी या वाहनाची खासियत आहे. नेक्सॉन भारतातील पहिली फाईव्ह स्टार ग्लोबल एनसीएपी रेटेड कार आहे तर अल्ट्रोज फाईव्ह स्टार जीएनसीएपी सेफ्टीसह त्या सेग्मेंट मधील एकमेव हचबॅक आहे. फोर स्टार ग्लोबल एनकॅप सेफ्टी रेटिंग मध्ये टिगोर आणि टियागो त्या सेगमेंट मधील सर्वात सुरक्षित कार्स आहेत.
भूतानसाठी टियागोची बेस प्राईज ७.३४ लाख एनयु (भूतानि नागुल्टम), टिगोर साठी ७.९९ लाख, नेक्सॉन साठी १०.५५ लाख, अल्ट्रोज साठी ८.९५ लाख, हॅरीअर साठी १८.३८ लाख तर सफारी साठी २४.४२ लाख अश्या किमती आहेत. भूतानचे चलन आणि भारतीय रुपया साधारण एकाच किमतीचे आहेत.