आयपीएल २०२२- केएल राहुलने मारली बाजी, बनला सर्वात महाग खेळाडू

आयपीएल २०२२ च्या सिझन मध्ये पंजाब किंग्सचा माजी सलामी फलंदाज केएल राहुल याने नव्याने आयपीएल मध्ये सामील झालेल्या लखनौ युनायटेडची कप्तानी मिळविली आहेच पण पगाराबाबत सुद्धा अन्य खेळाडूना मागे टाकून तो आयपीएल मधील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. या सलामी फलंदाजाला फ्रेन्चाईजी १७ कोटी रुपये पगार देणार आहे. राहुल आयपीएल या क्रिकेटच्या जगातील सर्वात छोट्या फॉर्मेट मधील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तसेच तो विकेट कीपिंग सुद्धा करतो. म्हणजे नव्या टीम मध्ये राहुल कप्तान आणि विकेट कीपर अश्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला १६ कोटी देऊन रीटेन केले आहे. गेल्या सिझन मध्ये त्याला १५ कोटी दिले गेले होते. आरसीबीची कप्तानी सोडलेल्या विराटला १५ कोटी मिळणार असून आजही तो टीमचा सर्वात महाग खेळाडू आहे. गेल्या सिझन मध्ये त्याला १७ कोटी मिळाले होते. चेन्नई सुपरकिंग्सच्या रवींद्र जडेजाला १६ कोटी, दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंत याला १६ कोटी देऊन रीटेन केले गेले आहे.

आयपीएलच्या गेल्या सलग चार सिझन मध्ये केएल राहुलने ५७५ प्लस धावा काढल्या आहेत. आयपीएल २०२० मध्ये १४ सामन्यात त्याने पाच अर्धशतके आणि १ शतक ठोकताना ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा केल्या होत्या आणि अग्रस्थानी राहून ऑरेंज कॅपचा बहुमान मिळविला होता.