राजेशाही जीवन जगतो अभिनेता अल्लू अर्जुन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा – द राईज’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला असून १७ डिसेंबर रोजी तो हिंदी सह तीन भाषेत रिलीज झाला आहे. यामुळे चर्चेत आलेल्या अल्लू अर्जुनच्या लाईफस्टाईलची चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रत्यक्षात अल्लू अर्जुनची राहणी अतिशय शाही असल्याचे कानॉलेज डॉट कॉम वर नमूद केले गेले आहे.
या माहितीनुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ४७ दशलक्ष डॉलर्स आहे. अल्लू आपल्या आर्थिक यशाचे सर्व श्रेय त्याच्या चाहत्यांना देतो. तो म्हणतो,’ चाहत्यांच्या प्रेमाशिवाय इतकी संपत्ती मिळविणे शक्य नाही. त्यांच्या प्रेमाच्या ताकदीवरच मी आयुष्य जगतो आहे.’ अल्लूला महागड्या घड्याळांचा शौक असून त्याच्या जवळ कार्टीअर सँटोज १०० एक्सएल, ह्ब्लोट बँगबँग स्टील कार्बन व रोलेक्स डेटोन अशी अनेक महागडी घड्याळे आहेत.
२०१९ मध्ये त्याने एक अलिशान,सर्व सुखसुविधा असलेली ७ कोटी रुपये किमतीची व्हॅनीटी व्हॅन खरेदी केली असून तिचे नाव द. फाल्कन असे ठेवले आहे. या व्हॅनिटीचे अनेक फोटो अल्लू सतत सोशल मिडियावर शेअर करतो. अल्लू त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलगा अयान व मुलगी अरहा यांच्यासह हैद्राबादच्या ज्युबिली हिल्स बंगल्यात वास्तव्यास आहे. ‘ब्लेसिंग’ नावाच्या या बंगल्याची किंमत १०० कोटी पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. अल्लू कडे लग्झरी कार्सचा ताफा आहे. त्यात हमस एच २, रेंजरोव्हर वोग, जग्वार, वोल्वो एक्ससी ९० टी ८ या कार्सचा समावेश आहे. अल्लू कडे खासगी विमान सुद्धा आहे.