नरेंद्र मोदी लोकप्रियतेत जगात नंबर वन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा डंका पुन्हा एकदा जगात वाजला आहे. अमेरिकन डेटा इंटेलीजन्स फर्म, मॉर्निंग कन्सल्ट पोलिटिकल इंटेलीजन्सने जारी केलेल्या ग्लोबल रेटिंग सर्व्हेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत ७१ टक्के रेटिंग मिळवून अग्रस्थानी असल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्यानंतर दोन नंबरवर मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस मॅन्यूअल ६६ टक्के तर इटलीचे मारियो ड्रॅगी ६० टक्के मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या सर्व्हेक्षणासाठी जगातील १३ नेत्यांचा विचार केला गेला होता. त्यात अमेरिकेचे जो बायडेन सहाव्या क्रमांकावर, कॅनडाचे जस्टीन टुडो ४३ टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन ४१ टक्के अशी क्रमवारी आहे. नोव्हेंबर मध्ये सुद्धा असेच सर्व्हेक्षण केले गेले होते तेव्हाही मोदीच अग्रस्थानी होते. ही संस्था सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, द. कोरिया, स्पेन, युके आणि युएसए देशाच्या नेत्यांचे रेटिंगवर लक्ष ठेऊन आहे. हे नवे रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२चे आहे.