अमेरिकेत आज फाईव्ह जी सेवा सुरु, विमान उड्डाणे रद्द

अमेरिकेत आजपासून फाईव्ह जी सेवा सुरु होत असतानाचा अनेक विमान उड्डाणे रद्द केली गेली आहेत. भारताच्या एअर इंडियानेही अमेरिकेची उड्डाणे रद्द केली असून सध्या भारतातून फक्त एअर इंडियाच अमेरिकेसाठी उड्डाण सेवा देत आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे एअर लाईन्सच्या फ्रेक्वेंसी मध्ये बाधा निर्माण होऊ शकते अशी आशंका यापूर्वीच अनेक विमान कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

युनायटेड एअरलाईन्सने अमेरिका सरकारला फाईव्ह जी सेवा विमान उड्डाणावर गंभीर प्रभाव पाडू शकते त्यामुळे काही काळासाठी फाईव्ह जी सेवा सुरवात पुढे ढकलावी अशी विनंती केली होती. दुबईच्या एमिरेटस एअरलाईनने सुद्धा हा धोका लक्षात घेऊन त्यांची अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द केल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. अमेरिकेच्या तमाम बड्या विमान कंपन्यानी बायडेन प्रशासनाला हस्तक्षेप करावा आणि फाईव्ह जी सेवा काही काळासाठी प्रलंबित करावी असे पत्र दिले आहे. त्यावर १० विमान कंपन्यांनी सह्या केल्या आहेत. त्यात एअर लाईन्स आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्याच्या मध्ये चर्चा सुरु आहेत तो पर्यंत या सेवेला परवानगी दिली जाऊ नये असे नमूद केले गेले आहे.

विमानतळ परिसरात फाईव्ह जी नेटवर्क मुळे विमाने उड्डाण करत असताना किंवा उतरत असताना अल्टीमीटर च्या कार्यात फ्रिक्वेन्सी बाधा येऊ शकते. अल्टीमीटर विमानाची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी आवश्यक असून त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये बाधा येऊन चुकीचे सिग्नल दिले जाण्याचा धोका येऊ शकतो. त्याचा थेट परिणाम विमान सुरक्षित उतरविणे किंवा उडविणे यावर होतो असे सांगितले जात आहे.