या देशात माणसामुळे उंदरांना झाला करोना

करोना महामारीचा प्रकोप अद्यापि शमलेला नाही. हॉंगकॉंग मधून या संदर्भात एक विचित्र बातमी आली आहे. येथील सुमारे २ हजार हॅमस्टर म्हणजे एक प्रकारच्या उंदरांना करोनाची लागण झाली आहे. हे सर्व उंदीर ठार केले जाणार आहेत. प्रशासनाने त्याबाबत निर्णय जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील एका पाळीव प्राणी विक्री दुकानात एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे सोमवारी लक्षात आले. त्याच्यामुळे हा करोना संसर्ग दुकानातील उंदरांना झाला. यामुळे प्रशासनाने हॅमस्टरच्या आयात निर्यातीवर बंदी घातली आहे. उंदरांकडून हा संसर्ग माणसात पोहोचेल याचे कुठलेही पुरावे अद्यापी मिळालेले नाहीत तरीही ७ जानेवारी पर्यंत ज्यांनी ज्यांनी हॅमस्टर खरेदी केले आहेत ते सर्व प्रशासनाला परत करायचे आहेत आणि हे सर्व हॅमस्टर ठार मारले जाणार आहेत.

हॉंगकॉंग मध्ये सर्व पाळीव प्राणी स्टोअर्स मधील खरेदी विक्री बंद केली गेली असून २२ सप्टेंबर पूर्वी ज्यांनी खरेदी केली त्या सर्व नागरिकांना कोविड चाचणी करून घेण्याचे आणि चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत विलीगीकरणात राहण्याचे आदेश जारी केले गेले आहेत असे समजते.