इंडिया ओपन सुपर ५००, लक्ष्य सेन चँपियन

इंडिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धत रविवार भारतासाठी गोल्डन डे ठरला. युवा शटलर लक्ष्य सेन याने पुरुष अंतिम सामन्यात वर्ल्ड चँपियन लोह किं यु याच्यावर सरळ सेट मध्ये मात करून विजेतेपद पटकावले तर त्यापूर्वी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी पुरुष डबल्स फायनल मध्ये तीन वेळच्या विजेत्या इंडोनेशियन जोडीला पराभूत करून विजेतेपद मिळविले.

लक्ष्य सेन याने अंतिम फेरीत सिंगापूरच्या वर्ल्ड चँपियन लोह किन यु यांच्यावर २४-२२,२१-१७ असा सरळ सेट मध्ये विजय मिळविला, इंडियन ओपन इतिहासात प्रथमच भारतीय जोडीने दुहेरीचा खिताब जिंकला आहे. चिराग सात्विक जोडीने दुसऱ्यांदा सुपर ५०० खिताब जिंकला असून यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये थायलंड ओपन सुपर ५०० मध्ये अजिंक्यपद मिळविले होते.