ठरलं! चरणजितसिंह सिंह चन्नी हे चमकौर साहिब येथून, तर नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्व मधून लढवणार निवडणूक


अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूकाचे बिगुल वाजले असून 86 उमेदवारांची यादी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. चमकौर साहिब येथून विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी हे, तर अमृतसर पूर्व मधून नवजोत सिंह सिद्धू निवडणूक लढवणार आहेत. मोगा येथून सोनू सूदची बहिण मालविका सूद निवडणूक लढवणार आहे. तर कादियानमधून प्रताप सिंह बाजवा आणि मानसा या मतदारसंघातून गायक सिद्धू मूसेवाला निवडणूक लढवणार आहेत. सुजानपूर मतदारसंघातून नरेश पुरी, पठानकोटमधून अमित विज, गुरदासपूर येथे बरिंदरजीत सिंह पहरा यांना काँग्रेस पक्षाने तिकिट दिले आहे.


पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022 रोजी संपणार आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल.