तामिळनाडूमध्ये कोरोना नियमांचे उलंल्घन करत जलीलकट्टूचे आयोजन; १ ठार, ५९ जखमी


मदुराई – कोरोनाचे सर्व नियमांचे उल्लंघन तामिळनाडूतील जलीकट्टू स्पर्धेमध्ये केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारपासून दाक्षिणात्य राज्यांमध्ये जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झाली. आज या खेळांचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणाऱ्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या १८ वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झाला आहे.

बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या जल्लीकट्टू या खेळाच्या आयोजनाला पोंगलच्या दिवशी सुरुवात केले. पहिल्याच दिवशी या खेळादरम्यान ५९ जण जखमी झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे राज्य सरकारने या वर्षीही खेळाच्या ठिकाणी बसण्यासाठी १५० जणांची आसन क्षमता आणि उपस्थित १५० जण अशी प्रेक्षक संख्या निश्चित केली आहे. १५० ही आसन क्षमता सामान्य संख्येच्या ५० टक्के एवढे आहे. पण या नियमांचे पालन केले जात असल्याचे चित्र दिसत नाही. अनेक ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे चित्र दिसत आहे.

मदुराईमध्ये आज हा खेळ खेळवला जात असून तिथेही कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सरकारने कोरोना नियमांचे पालन करुन या खेळांच्या आयोजनाला परवानगी दिली होती. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना तसेच ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना अशाप्रकारे गर्दी करुन खेळांचे आयोजन केले जात असल्याबद्दल अनेकांनी आक्षेप व्यक्त केला आहे.