काल दिवसभरात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनासोबतच ओमिक्रॉनबाधित देखील वाढत आहेत. काल दिवसभरात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर काल दिवसभरात देशात कोरोनामुळे 402 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ओमिकॉनबाधितांच्या आकडेवारीत देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत देशात ओमिक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या देशाचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 16.66 टक्के आहे. जो काल 14.78 टक्के होता. म्हणजे दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेटमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 2 लाख 64 हजार 202 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यामध्ये आज 4 हजार 631 रुग्णांची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 14 लाख 17 हजार 820 झाली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 लाख 85 हजार 752 लोकांनी आपला जीव गमावला आहे. काल दिवसभरात 1 लाख 22 हजार 622 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 49 लाख 47 हजार 390 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी होती. त्यामध्ये आज वाढ झाली आहे.

त्याचबरोबर देशात सध्या लसीकरण मोहिमेने देखील वेग पकडला आहे. अद्याप ज्या लोकांनी लस घेतली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 156 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 58 लाख 2 हजार 976 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 156 कोटी 2 लाख 51 हजार 117 लसींचे डोस देण्यात आले आहेत.