येतोय दमदार बॅटरीचा टेक्नो पोवा निओ स्मार्टफोन

गेल्या महिन्यात ट्राझीशन ब्रांड टेक्नोने नायजेरियात टेक्नो पोवा निओ स्मार्टफोन लाँच केला होता. आता हा फोन भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल होत असल्याचे संकेत टेक्नो इंडियाने ट्वीटर वर एक टीझर रिलीज करून दिले आहेत. या फोनचे मुख्य आकर्षण ६ हजार एमएएचची बॅटरी हे आहे. या फोनच्या हॅडसेटचा छोटा टीझर रिलीज केला गेला आहे. मात्र कोणत्या तारखेला फोन लाँच होणार याचा खुलासा केला गेलेला नाही.

या फोनवर लाँचिंग ऑफर दिली जाणार असल्याचे म्हटले गेले आहे. फोन खरेदी करणाऱ्याला वायरलेस ईअरबड मोफत मिळणार आहेत. ६.२ इंची डिस्प्ले दिला जात असून गेमिंग आणि व्हीडीओ स्ट्रीमिंगचा चांगला अनुभव युजरला मिळेल असा दावा केला गेला आहे. फोनला १३ एमपी एआय ड्युअल रिअर कॅमेरा क्वाड फ्लॅशलाईट सह दिला गेला असून सेल्फी साठी ८ एमपी कॅमेरा ड्युअल फ्लॅशलाईटसह आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची नायजेरियातील किंमत एनगीव्ही ७२५०० असून भारतात या फोनची किंमत साधारण १३ हजार असेल असे संकेत दिले गेले आहेत.