प्रिन्स अँड्र्यू ‘वॉर हिरो’ ते ‘प्ले बॉय प्रिन्स’

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचा द्वितीय पुत्र प्रिन्स अँड्र्यू यांच्याविरोधात लैगिक शोषण संदर्भात झालेल्या आरोपांची सुनावणी कोर्टात सुरु झाली असून प्रिन्स अँड्र्यू यांनी राजघराण्याचे सर्व अधिकारी सोडले आहेत. बकिंघम पॅलेस कडून महाराणी एलिझाबेथ यांनी प्रिन्स अँड्र्यू यांचे सर्व अधिकार काढून घेण्यास तसेच त्यांचे सैन्य पदवी, सन्मान काढून घेण्यास मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. एके काळी युद्धात पराक्रम गाजविल्याने ‘वॉर हिरो’ असा सन्मान मिळविलेल्या प्रिन्सन आता ‘प्ले बॉय प्रिन्स’ असे हिणविले जात असल्याचे समजते. ब्रिटीश राजघराण्याच्या गादी वारसा यादीत प्रिन्स अँड्र्यू नवव्या स्थानी होते.

व्हर्जिनिया रोबर्टस ग्रिफे या महिलेने जेफरी एप्स्टीन याने बळजबरीने प्रिन्स अँड्र्यू आणि त्याच्या काही मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केल्याचा आरोप केला आहे. २०१९ मध्ये ग्रिफे हिने सर्वप्रथम बीबीसीला ब्रिटनच्या प्रिन्स सोबत लैगिक संबंध ठेवण्याची  जबरदस्ती केली गेल्याचे सांगितले होते. या संदर्भात बकिंघम पॅलेस कडून ग्रिफे हिने केलेले आरोप नेहमीच नाकारले गेले होते. मात्र प्रिन्स अँड्र्यू यांनी मात्र आरोप होताच शाही पदाचा त्याग केला होता.

प्रिन्स अँड्र्यू यांनी महाराणीला त्यांना राजघराण्याच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होण्याची अनुमती मागितली होती. आपल्या विश्वासाला धक्का बसल्याने २०१९ नंतर प्रिन्स कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. इतकेच काय पण स्वतःच्या मुलीच्या लग्नातील कौटुंबिक फोटो मध्ये सुद्धा ते दिसले नाहीत.

१९७८ मध्ये प्रिन्स अँड्र्यू रोयाल नेव्हीच्या एविएशन विंग मध्ये दाखल झाले होते. २ एप्रिल १९८२ आमध्ये ब्रिटीश ओव्हरसीज फॉकलंडवर झालेल्या आक्रमणानंतर तेव्हा झालेल्या युद्धात प्रिन्स सहभागी झाले होते आणि त्यांनी सी किंग तेली मध्ये को पायलट म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. त्यावेळी युद्धभूमीवरून परतल्यावर त्यांच्या स्वागताला आई राणी एलिझाबेथ आणि वडील प्रिन्स फिलीप स्वतः आले होते. तेव्हा त्यांना वॉर प्रिन्स असे संबोधले गेले होते.