पश्चिम बंगालमध्ये ‘बीकानेर एक्स्प्रेस’चे ४ डबे रेल्वे रुळावरुन घसरले


जलपाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील मैनगुडी परिसरात बीकानेर एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले असून यात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळावरुन रेल्वेचे एकूण चार डबे घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बीकानेर एक्सप्रेस पाटणाहून आसामच्या गुवाहाटी येथे जात होती. याच दरम्यान मैनागुडी येथे रेल्वे रुळावरुन घसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेसह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रेल्वे डब्यांतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले जात आहे. अद्याप जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.