लग्नाआधी मौनी रॉयचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल


आधी टीव्ही जगत आणि नंतर बॉलिवूड आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. लवकरच तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत मौनी रॉय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पण ती त्याआधी पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

आपल्या इन्स्टाग्रामवर नुकतेच मौनी रॉयने काही फोटो शेअर केले आहे. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्विमिंगपूलच्या कडेला एन्जॉय करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हे फोटो मौनीने शेअर केल्यानंतर काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. ती खूपच हॉट या फोटोमध्ये दिसत असून तिचा हा अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे.


सोशल मीडियावर मौनीने फोटो शेअर केल्यानंतर तासाभरातच 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे फोटो लाइक केले आहेत. लग्नाआधी तिचा हा हॉट आणि बोल्ड अवतार सर्वांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. मौनीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांसह अभिनेत्री आशका गोराडिया आणि आमना शरीफ यांनींही कमेंट केल्या आहेत. दरम्यान अशाप्रकारे बिकिनी फोटो शेअर करण्याची मौनीची पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा तिनं इन्स्टाग्रामवर बिकिनी तसेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्याची बरीच चर्चा देखील झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या २७ जानेवारीला मौनी रॉय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती दुबईत राहणारा तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारशी लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाची सर्व तयारी झाली असून हे लग्न गोव्यात पार पडणार आहे. मौनी रॉयच्या या डेस्टिनेशन लग्न सोहळ्याला तिचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र उपस्थित असणार आहेत.