भल्याभल्या बाईक्सना टक्कर देणार होंडाची 2022 सीबी300आर; 2.77 लाख रुपये किंमत


आपली 2022 होंडा सीबी 300 आर मोटरसायकल होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने लॉन्च केली आहे. 2.77 लाख रुपये एवढी या बाईकची किंमत ठेवण्यात आली आहे. दोन कलर ऑप्शन्समध्ये नवी होंडा सीबी300आर उपलब्ध होणार आहे. ही बाईक मॅट स्टील ब्लॅक आणि पर्ल स्पार्टन रेड कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. बाईकची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. ही बाईक कंपनीच्या मिड साइज मोटरसायकल सेगमेंट पोर्टफोलियोला मजबूत करण्याचे काम करेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

PGM-FI तंत्रज्ञानासोबत 286cc DOHC चार-वॉल्व लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन 2022 होंडा सीबी300आर मध्ये देण्यात आले आहे. 6-स्पीड गिअरबॉक्स सोबत याला जोडण्यात आले आहे. 9000rpm वर हे इंजिन 31 bhp पावर आणि 6500 rpm वर 27.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करु शकते. असिस्ट आणि स्लिपर क्लच या बाईकमध्ये देण्यात आले आहे.

2022 होंडा सीबी300आरच्या फ्रंटमध्ये 296mm हब-लेस फ्लोटिंग डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 220mm रिअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-चॅनल ABS आहे. बाईकच्या सर्क्युलर हेडलँपमध्ये एलईडी युनिट्स आणि इंटिग्रेटेड एलईडी डे-टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. तसेच याचे साईड्स स्लीक एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्ससह देण्यात आले आहेत.

2022 होंडा सीबी300आर बाईकचा डॅशिंग लूक हिची खरी ओळख आहे. डिजिटल डिस्प्ले, मस्कुलर फ्यूल टँक, स्लीक एलईडी टेललाइट, कॉन्ट्रास्टिंग एग्जॉस्ट, ब्लॅक अलॉय व्हिल्स यांसारखे एलिमेंट्स यामध्ये देण्यात आले आहेत. यामुळे या बाईकला प्रिमियम लूक मिळण्यास मदत होते. याच्या कॉम्पॅक्ट डिजिटल इंस्ट्रमेंट डिस्प्लेवर सगळी माहिती मिळते. यामध्ये इंजिन इनहिबिटरसोबत गिअर पोझिशन आणि साईड स्टँड इंडिकेटरही देण्यात आला आहे.
https://media.zigcdn.com/media/content/2019/Jan/2018-honda-cb300r-08-11.jpg
दरम्यान 2022 होंडा सीबी300आरची बाजारात स्पर्धा केटीएम 390 ड्यूक, बीएमडब्ल्यू जी 310 आर, बजाज Dominar 400 आणि टीव्हीएस Apache RR310 यांसारख्या बाईक्सशी असणार आहे. त्याचबरोबर होंडा CB300R आगामी रॉयल एनफील्ड Scram 411 ला देखील टक्कर देणार आहे.