गोविंदा नव्या गाण्यातील डान्सिंग स्टाईलमुळे झाला ट्रोल


बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने ८० ते ९०च्या काळात हिट चित्रपटांची अक्षरक्ष: रांग लावली होती. ‘हिरो नंबर वन’, ‘राजा बाबू’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘दुल्हे राजा’ यासारखे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. गोविंदाचे नुकतेच हॅलो हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याद्वारे तो म्युझिक व्हिडीओमध्ये आपली छाप पाडताना दिसत आहे. पण त्याला या गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे ट्रोल केले जात आहे.


नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर गोविंदाने म्युझिक व्हिडीओतील नवे गाणे शेअर केले आहे. गोविंदासोबत या गाण्यात अभिनेत्री निशा शर्मा डान्स करताना दिसत आहे. गोविंदा या गाण्यात त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. पण या गाण्यातील त्याची ती जुनी स्टाईल पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

इन्स्टाग्रामवर आपले नवीन गाणे गोविंदाने शेअर केल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. गोविंदा सर कृपया ९० च्या दशकातून बाहेर या, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने हे जग २०२२ पर्यंत पुढे आले आहे, पण गोविंदा तुम्ही अजूनही ९० च्या दशकात असल्याची कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. दरम्यान यापूर्वीही या म्युझिक अल्बमद्वारे गोविंदाची दोन गाणी रिलीज करण्यात आली आहेत. लोकांनी त्या व्हिडीओलाही फारशी पसंती दिली नव्हती. त्यानंतर आता या नवीन व्हिडीओद्वारे त्याला ट्रोल केले जात आहे.