…अखेर महेश मांजरेकर यांनी चित्रपटावरील वादावर सोडले मौन


सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या वादासाठी नेहमी हटके आणि वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे चांगलीच चर्चा सुरु असून यावरुन विरोध दर्शवला जात आहे. याची दखल केंद्रीय तसेच राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरुन हटवण्यात आला आहे.

दरम्यान एबीपी माझाशी बोलताना या वादावर महेश मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. टीकाकारांच्या टीकेवर माझा चित्रपटच बोलेल. ट्रेलर बघून टीका करणाऱ्यांना मी काय उत्तर देऊ? माझ्या नटसम्राट, भाईसारख्या चित्रपटांनाही विरोध झाला होता. स्लमडॉगसारख्या चित्रपटालाही विरोध झाला होता. पण नंतर तो चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये होता, असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत.