पाक संसदेत बिलावल भुट्टोची इमरान खान वर तोफ- प्ले बॉय असा केला उल्लेख

पाकिस्तानातील प्रमुख विरोधी दल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तोफ डागताना त्यांचा उल्लेख ‘प्ले बॉय’ असा केला. बुधवारी संसदेत मिनी अर्थसंकल्प सादर केला जात असताना हा प्रकार घडला. बिलावल यांनी इम्रान सरकार करांची त्सुनामी आणत आहे असे सांगताना कंडोमवर लावलेल्या कराबाबत टीकेची झोड उठवली.

बिलावल म्हणाले, इम्रान सारख्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. पंतप्रधान होण्यापूर्वी इम्रान यांची प्रतिमा ‘प्ले बॉय’ अशी होती त्यांना हे शोभत नाही. विशेष म्हणजे इम्रान यांची चार लग्ने झाली आहेत आणि त्यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे बोलले जाते. क्रिकेटर म्हणून कारकीर्द करत असताना इम्रान यांच्या रंगीन आयुष्याचे किती तरी फोटो नेहमीचा चर्चेत होते.

याला अनुलक्षून बोलताना बिलावल म्हणाले, पाकिस्तान, भारत, बांग्लादेश येथे वाढती लोकसंख्या हा मोठा प्रश्न आहे. देशात खायला, प्यायला पुरेसे नाही. शिवाय शिक्षण, रोजगार समस्या गंभीर आहे. देशात एडस, एचआयव्ही रुग्ण संख्या वाढते आहे. जगात सर्वत्र गर्भनिरोधक वापरण्यास प्रोत्साहन दिले जात असताना पंतप्रधानांनी मात्र कंडोमवर कर लावला आहे.