सॅमसंगचा २०२२ चा पहिला फ्लॅगशिप फोन भारतात लाँच

सॅमसंगने त्यांचा नवीन वर्ष २०२२ मधला पहिला प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलॅक्सी एस २१ एफ ई भारतात लाँच केला असून हा फाईव्ह जी सपोर्ट फोन आहे. खास प्रकारचा ट्रिपल रिअर कॅमेरा आणि अँड्राईड १२ ओएस अशी याची खास फीचर्स आहेत. हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये आहे. ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज अशी ही दोन व्हेरीयंट असून त्यांच्या किमती अनुक्रमे ४९९९९ व ५३९९९ रुपये आहेत. ११ जानेवारीपासून या फोनची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर आणि अमेझोनवर सुरु झाली आहे. ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ११ ते १७ जानेवारी दरम्यान काही ऑफर्स दिल्या गेल्या आहेत.

या फोन साठी ६.४ इंची फुल एचडी प्लस डायनामिक अमोलेड टू एक्स डिस्प्ले सुपर स्ट्रॉंग कॉर्निंग गोरील्ला ग्लाससह दिला गेला आहे. स्लिक आणि स्लिम डिझाईनच्या या फोनसाठी स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर असून फोन वॉटर, डस्ट रेसिस्टंट आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेट मध्ये १२ एमपीचे अल्ट्रावाईड, १२ एमपीचे प्रायमरी आणि ८ एमपीचे टेलीफोटो लेन्स दिले गेले आहे. सेल्फीसाठी ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. रिअर कॅमेरा मध्ये चांगल्या अनुभवासाठी ड्युअल रेकॉर्ड, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड आणि ३० एक्स झूम फीचर्स दिली गेली आहेत.

फोनसाठी ४५०० एमएएचची बॅटरी २५ डब्ल्यू वायर्ड आणि १५ डब्ल्यू वायरलेस चार्जिंग सपोर्टसह आहे. चार कलर ऑप्शन मध्ये हा फोन मिळणार आहे.