मुंबईची चांगली बातमी, कमी होताहेत करोना केसेस
मुंबईतून एक चांगली बातमी आली असून शहरात गेल्या सलग चार दिवसात करोनाच्या नव्या केसेस येण्याची प्रमाण कमी झाले असून गेल्या दोन दिवसात पॉझीटीव्ह रेट १० टक्के घटला आहे. गेल्या २४ तासात ११६४७ नव्या केसेस आल्या असल्या तरी त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. शहरात सध्या रुग्णालयातील ७२८३ बेड भरलेले असले तरी ३६५७३ बेड रिकामे झाले आहेत. शहरात करोना रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर गेला आहे आणि त्यामुळे मुंबईकराना करोना पासून थोडी सुटका मिळाली आहे.
सोमवारी नव्या केसेसच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडले गेले असल्याचे समजते. सोमवारी ओमिक्रोनचा एकही नवा संक्रमित सापडलेला नाही. सोमवारी महाराष्ट्रात ३०४७० नवे करोना बाधित सापडले त्यात मुंबईतील १३६४८ रुग्ण होते. २७२१४ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी ७० टक्के अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. मुंबईत सलग तीन दिवस २० हजारापेक्षा अधिक नव्या केसेस आल्या होत्या पण रविवार पासून त्यात घट झालेली दिसत आहे. रुग्ण संख्या कमी दिसण्यामागे कमी टेस्टिंग हे कारण असू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. सोमवारी ५ करोना मृत्यू झाले होते तर मंगळवारी २ रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला आहे.