आयुष्मान खुरानाची मुंबईत अलिशान घर खरेदी
बॉलीवूड मध्ये अल्पावधीत आपल्या दमदार अभिनयाने आणि आगळे विषय असलेल्या चित्रपटाची निवड करून प्रसिद्धीचा वेगळा टप्पा गाठणाऱ्या आयुष्मान खुराना याने मुंबईत त्याच्या स्वप्नातील घराची खरेदी केली आहे. मनी कंट्रोलच्या बातमीनुसार आयुष्मानच्या नव्या घराची किंमत १९ कोटी रुपये असून घराला चार कार पार्किंग आहेत. पत्नी आणि मुलांसह आयुष्मान लवकरच या घरात राहायला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी आयुष्मानने या घराचे रजिस्ट्रेशन केले होते असे समजते. हे घर ४०२० चौरस फुटाचे आहे.
आयुष्मानने त्याचे मूळ गाव पंचकुला येथेही काही दिवसांपूर्वी एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत ९ कोटी असल्याचे सांगितले जाते. या बंगला खरेदीविषयी लिहिताना आयुष्मानने नवीन फमिली होम खरेदी केल्याचे आणि घरातील सर्व परिवाराच्या पसंतीने हे घर खरेदी झाल्याचे लिहिले होते. या घरात सर्व खुराना परिवार एकत्र राहू शकेल म्हणून हे घर खरेदी केले असेही त्याने लिहिले होते.
आयुष्मानच्या चंडीगड करे आशिकी हा वेगळ्या विषयावरच चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मान, अनुभव सिन्हा यांच्या एका नव्या चित्रपटात काम करत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.