ब्रिटेनच्या रोल्स रॉयस मोटर्स कारने प्रस्थापित केला नवा विक्रम


ब्रिटन – कोरोना काळामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योगांना झळ पोहोचल्याचे चित्र आहे. कार निर्मिती क्षेत्राला कोरोनाकाळात सर्वाधिक फटका बसला. पण असे असले तरी नवा विक्रम ब्रिटेनच्या रोल्स रॉयस मोटर्स कारने प्रस्थापित केला आहे. कोरोना आणि सेमी कंडक्टरची संकट असूनही लक्झरी स्टेटस असलेल्या रॉल्स रॉयस कंपनीने गेल्या वर्षात गाड्यांची विक्रमी विक्री केली आहे. रोल्स रॉयस मोटर कार्सचे सीईओ मुलर ओटवोस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, २०२१ हे रोल्स-रॉयससाठी अभूतपूर्व वर्ष ठरले. आमच्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडले. मॉडेलला जागतिक बाजारपेठेत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन आमच्या ग्राहकांना पसंतीच्या कारचे वेळेवर वितरण केले.

याबाबत जर्मनी लक्झरी कार निर्मात्याने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका (यूएस), आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि चीनसह जगातील अनेक देशांमध्ये चांगली कामगिरी करून वाहन विक्रीचा हा नवा टप्पा गाठला आहे. काही देशांमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कंपनीच्या लक्झरी वाहनांची विक्री जवळपास ५० टक्क्यांनी वाढून ५,५८६ वर पोहोचली आहे. ऑटो निर्माता कंपनी रोल्स रॉयस आपली पहिली इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. २० व्या शतकाच्या सुरूवातीस स्थापित हा ब्रिटीश ब्रँड १९९८ मध्ये जर्मन ऑटो दिग्गज बीएमडब्ल्यूने विकत घेतला होता.