जी मेलने नोंदविले रेकॉर्ड

ई मेल म्हटले कि प्रथम आठवते ती गुगलची जी मेल सेवा. या गुगल मेलिंग सेवेने नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. गुगल प्लेस्टोर मधून जी मेल अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्याचा आकडा १० अब्जावर गेला असून जी मेल प्ले स्टोर मधून वारंवार डाऊनलोड होणाऱ्या लोकप्रिय अॅप लिस्ट मध्ये सामील झाले आहे. जी मेलच्या अगोदर आणखी तीन अॅप्स १० अब्ज पेक्षा अधिक वेळा डाऊनलोड केली गेली असून ही सर्व अॅप्स गुगलचीच आहेत.

या यादीत गुगल प्ले सर्व्हिस, यु ट्यूब आणि गुगल मॅपचा अगोदरच समावेश झाला होता आता त्यात गुगल जी मेलची भर पडली आहे. टयूट्यूब आणि जी मेल अत्यंत लोकप्रिय असून अँड्राईड फोन साठी वापर करताना जी मेल आयडी असणे गरजेचे असते. जी मेलने आपण पाठविलेली मेल पुन्हा अनडू करण्यासाठी नवे फिचर आणले असून त्यात ३० सेकंदात पाठविलेली मेल अनडू करता येते. पूर्वी हा कालावधी फक्त ५ सेकंद होता. गुगलने इनबॉक्स स्पॅम फोल्डर मध्ये सुद्धा बदल केला आहे. कंपनी सतत हे बदल करते त्यामुळे युजर्स त्यांच्या अॅप्सशी जोडले राहतात असे सांगितले जाते.