काल दिवसभरात 1 लाख 79 हजार 723 कोरोनाबाधितांची नोंद, तर 146 बाधितांची मृत्यु


नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली असून देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असताना काल दिवसभरात देशात 1 लाख 79 हजार 723 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 146 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत देशात 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी 4 लाख 83 हजार 936 वर पोहोचली आहे. त्याचबरोबरच 3 कोटी 45 लाख 172 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आतापर्यंत देशात 4 हजार 33 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त रूग्ण राजस्थानमध्ये आढळले आहेत. राजस्थानध्ये आतापर्यंत 1 हजार 216 ओमिक्रॉनबाधित रूग्ण आढळले आहेत. राजस्थान नंतर महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. आजपासून बुस्टर डोस देण्सासही सुरूवात झाली आहे. देशभरात आतापर्यंत 151 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. देशात रविवारी 13 लाख 52 हजार 717 जणांची कोरोना चाचणी केली आहे.