केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोनाबाधित


नवी दिल्ली – कोरोना महामारीची तिसरी लाट देशात आली असून, कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण सापडत आहेत. दरम्यान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

याबाबतची माहिती स्वत: राजनाथ सिंह यांनी ट्विट करून दिली आहे. सौम्य लक्षणांसह माझी आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.


देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते कोरोनाची तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल म्हणाले की, देशात या काळात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकते. त्याचबरोबर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनसारख्या निर्बंधांशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते. याशिवाय गतवर्षीप्रमाणे या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही.