ऑस्ट्रेलिया सरकार विरोधातील खटला नोव्हाक जोकोव्हिचने जिंकला


मेलबर्न – मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये चार दिवस घालवल्यानंतर टेनिस विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचच्या ऑस्ट्रेलियातून परत पाठवणीच्या खटल्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच मेलबर्न न्यायालयाने निकाल दिला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील खटला नोव्हाक जोकोव्हिचने जिंकला आहे. न्यायालयाने नोव्हाकला मोठा दिलासा मिळाला असून ऑस्ट्रेलिया सरकारला चांगलाच झटका दिला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारकडून नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियात वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना दाखल झालेल्या जोकोव्हिचचा मुक्काम लांबणार की त्याला मायदेशी परत पाठवले जाणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दरम्यान न्यायालयाने निर्णय दिला असून नोव्हाक जोकोव्हिचचा ऑस्ट्रेलियातील मुक्काम वाढला आहे. नोव्हाक जोकोव्हिचचा पासपोर्ट आणि इतर सामान परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पण न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्याकडे अद्यापही नोव्हाक जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियाबाहेर पाठवण्याची ताकद आहे, त्यामुळे यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.