हृतिकचा ‘विक्रम वेधा’मधील फर्स्ट लूक आला समोर


आज १० जानेवारी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा वाढदिवस असून त्याचा आगामी चित्रपट विक्रम वेधामधील फर्स्ट लूक त्या निमित्ताने सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. सध्या हृतिकचा हा लूक चर्चेत असून अनेकांनी त्याच्या लूकवर कमेंट केल्या आहेत.


दाक्षिणात्य चित्रपटाचा ‘विक्रम वेधा’ हा हिंदी रिमेक आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली होती. विजय सेतुपती आणि आर माधवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यानंतर या चित्रपटाचा आता हिंदी रिमेक येणार असल्यामुळे ऋतिकचे चाहते आनंदी आहे. हृतिक या हिंदी रिमेकमध्ये कुख्यात गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिकचा चित्रपटातील लूक आता समोर आला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हृतिकने ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘वेधा’ असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच ही पोस्ट सैफ अली खानला टॅग केली आहे. हृतिकचा चित्रपटातील फर्स्ट लूक आर माधवनने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘मला असाच वेधा पाहायचा होता. खूप मस्त’ असे कॅप्शन दिले आहे. ३० सप्टेंबर २०२२मध्ये ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट रिलीज होणे अपेक्षित आहे. पण चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.