टाटाने १९९१ मध्ये लॉन्च केलेली भारताची पहिली स्वदेशी एसयूव्ही होणार इलेक्ट्रिक


नवी दिल्ली – पुढील पाच वर्षांत १० इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्स बाजारात आणणार आहे. या सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. नेक्सनच्या यशानंतर कंपनी इलेक्ट्रिक गाड्यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच कंपनी नेक्सनचे अधिक शक्तिशाली व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता आयकॉनिक सिएरा (टाटा सिएरा) देखील नवीन अवतारात आणत आहे. हे कंपनीचे पहिले मॉडेल असेल, जे ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. पुन्हा एकदा बाजारात भारतात बनवलेली पहिली स्वदेशी एसयूव्ही कमबॅक करणार आहे. टाटा मोटर्सने प्रथम १९९१ मध्ये लॉन्च केली होती. आता टाटा सिएरा नवीन युगातील इलेक्ट्रिक वाहन म्हणून रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

ऑटो एक्स्पो २०२० मध्ये, ते एक संकल्पना वाहन म्हणून कंपनीने सादर केले. टाटा मोटर्सची ही पहिली कार असेल जी फक्त इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येईल, म्हणजेच ती कंपनीची इलेक्ट्रिक कार असेल. त्याचे पेट्रोल किंवा डिझेल वर्जन येणार नाही. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सिग्मा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. टाटा सिएरा या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सध्या कंपनीचे Nexon EV आणि Tigor EV फक्त त्यांच्या पेट्रोल इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहेत. नवीन सिएराला नवीन डोअर कॉम्बिनेशन मिळण्याची अपेक्षा आहे, तर जुन्या टाटा सिएराला तीन दरवाजे होते.

दरम्यान अद्याप पर्यंत भारतीय बाजारपेठेत टाटा सिएरा कधी उतरणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण ही कार २०२५ पर्यंत पूर्णपणे बाजारात येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, टाटा मोटर्स लवकरच आपल्या कारचे सीएनजी मॉडेल लॉन्च करणार आहे. Tiago CNG आणि Tigor CNG दोन्ही १९ जानेवारीला लॉन्च होणार आहेत.