कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना कोरोनाची लागण


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच पोलीस दलातील कर्मचारी देखील कोरोनाबाधित होत असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिस दलातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. एका दिवसांत 100 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ठाणे जिल्ह्यातील 392 पोलिसांनाही बाधा झाल्यामुळे पोलिस दलाची चिंता अधिकच वाढली आहे.