राज्यात अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या जास्त असली तरीही केवळ 1 टक्का आयसीयूत – राजेश टोपे


मुंबई – देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याबरोबर पाच राज्यांची आढावा बैठक संपन्न झाली. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होते. पुन्हा अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिलासाही दिला आहे. राज्यात 1.73 लाख अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण असले, तरीही केवळ 1 टक्का आयसीयूमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात एकूण अ‍ॅक्‍टिव्ह 1 लाख 73 रुग्ण हजार आहेत. मात्र, यामधील प्रामुख्याने आयसीयूमध्ये असलेले 1 हजार 711 रुग्ण आहे. म्हणजेच आयसीयूत असलेले 1 टक्का रुग्ण आहे. त्यापैकी ऑक्सिजनवर असलेले 5400 रुग्ण आहेत. राज्यात 38,850 आयसीयू बेड्स आहेत. यापैकी 1710 सध्या ऍडमिट आहेत. त्यामुळे बेड्सची एकूण उपलब्धता आणि त्यातुलनेत सध्याचे रुग्ण कमी आहेत. व्हेंटीलेटरच्या 16 हजारच्या बेड्सपैकी 3 ते 4 टक्केच रुग्ण सध्या आहेत. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाही.

रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असताना 7 दिवसांच्या कालावधीत त्यांच्याकडे कॉल सेंटरवरून पहिला, पाचवा आणि सातव्या दिवशी कॉल गेला पाहिजे. कुठलीही अडचण असेल तर तो कॉल सेंटरच्या लक्षात येईल. रुग्णालयाची गरज पडल्यास दाखल केले जाईल. भारत सरकारने सांगितले की, तुमच्याकडे किती आणि कशा प्रकारचे बेड आहेत. त्याचे फंक्शनिंग करून घ्या. कार्यान्वित आहेत की नाही चेक करून घ्या. 523 पैकी 404 ऑक्सिजन प्लांट सक्रिय, 8 दिवसांत उर्वरीतही दुरुस्त केले जाईल. उपचारासाठी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. केंद्राला माहिती दिलेली आहे, अशीही राजेश टोपे यांनी माहिती दिली.

केंद्राने ( ईसीआरटी-2 ) एमर्जंन्सी कोविड रिस्पॉन्स-2 हा निधी दिला. ठराविक कामानिमित्त हा देण्यात येतो. आम्ही प्रस्ताव पाठवले होते. मी मंत्री महोदयांना आज सांगितले की, आमच्या लेव्हलला गरजेप्रमाणे खर्च करता यावे, अशी परवानगी केंद्रीय मंत्र्यांकडे मागितली होती. ती त्यांच्याकडून मंजूर झाली आहे. निश्चित प्रमाणे दिलेल्या निधीनुसार टेंडर काढले गेले आहे. त्याचे आता कामेही सुरु झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्हॅक्सीनेशनमध्ये महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे काम करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करत त्या पद्धतीने कडक पद्धतीने समज देऊन त्यांचे व्हॅक्सिनेशन करण्याच्या सूचना दिल्या. 15+, प्रौढ नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे अशा तिन्ही प्रकारचे लसीकरण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. आणखी चांगले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कमी लसीकरण असलेल्या एकूण जिल्ह्यांची यादी केंद्राने तयार केली. औरंगाबादमध्ये लसीकरणाच्या संथ गतीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी व्हॅक्सीनेशन चांगले, त्या ठिकाणी हॉस्पिटलायजेशन कमी, मृत्यू कमी, त्यामुळे व्हॅक्सीनेशनवर भर द्या, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. अतिशय सतर्क राहून लसीकरण करावे, अशा सूचना आम्ही देखील राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.